मला आठवते सारे
एका भयाण दुपारी
सत्य सापडले मला
झाडा झुडुपांचे ठाई...
पुढे वाटेत भेटले
तुझ्या दुःखाचे पैठण
माय गोदेच्या किनारी
केले अश्रुंनी तर्पण..
आज श्वासांतून माझ्या
वाहे पश्चीमेचा वारा
वर दाटले आभाळ
खाली अंताचा पिसारा
अंध आपला विचार
खोटी आपली धिटाई
घेली निघोनी कधीची
मंदीरातून विठाई ....
विभ्रम...