कोलोरॅडो

एका छोट्याश्या इच्छेतून झालेला माझा उगम
वाहिले मी अवितर दगड धोंड्यातून, खडकातून
कधी शांत निवांत, तर कधी सुसाट वेगात
कधी निळ्याशार तृप्ततेनं, तर कधी साठलेल्या चिखलातून
झोकून दिलं स्वतःला, त्या उंच कड्यावरुन,
तुझ्या भेटीच्या आशेनं,मैलोंमैल चालताना, तुझ्या दिशेनं...
आणि चालता चालता मधेच कुठतरी जाणवलं,
आता पुन्हा कधीच आपली भेट होऊ शकणार नाही...
"Colorado can never meet the sea again"
अर्धाच राहिलेला एक अपुरा प्रवास,
आणि आधांतरी राहिलेली ईच्छा घेउन
आटून गेले मी.... "कोलोरॅडो कॅन नेव्हर मीट द सी अगेन"