माये! तुटतंय गं...

माये! तुटतंय गं...
.

म्हमईचा सायबा आलाता
मोप मोप बोलला ...
आवतान दिलनी जाताना,
म्हमईला चाल म्हनाला!
जाऊ काय गं... माये!!!
पोटात तुटतंय!
काळ्या आईची नाळ,
जन्मा पासून जुळल्याली ..
म्हायाच हातानं मीच कापू?
म्हमईला जाऊन कुठं राहू?
हितलं छप्पार ....
माये कालजात तुटतंय गं...
पिकं काढणार्‍या हातांना
कोनत काम देऊ!

स्वाती फडणीस ............ ०८-०५-२००८