पुन्हा एकदा..

तू दिसलीस गं, दिसलीस तू अन् पुन्हां एकदा, 

ओळखीचे स्मित उमलून आले, पुन्हां एकदा..

अंतरात नादल्या सतारी, दिडदा, दिडदा, 

तीच जुनी धून ओठी आली, पुन्हां एकदा..

नाव तुझे जे, मनात जपले, किती-कितीदा,

आज अचानक ओठी आले, पुन्हां एकदा..

पाउलवाटेवरी चाललो, रमलो कितिदा, 

तू आलीस, अन् दरवळली बघ, पुन्हां एकदा..

नदीतीरी बसलो जळात सोडून पाय कितीदा, 

स्मृतिलहरी झंकारून उठल्या, पुन्हां एकदा..

तुलाही सारे आठवते कां, सांग एकदा, 

जगेन पळभर, पुन्हां एकदा, बस्स, एकदा.....