पालखी

पालखी काळाची,थांबली एकदा ।

             बदलण्या खांदा,भोइयांचा ॥१॥

त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती ।

             पेटवून ज्योती, अंतरात ॥२॥

पालखी काळाची, गेली निघोनिया ।

             ज्योत ठेवोनिया, तेवतीच ॥३॥

आता वाट आहे, पहायाची फक्त ।

              क्षणातून मुक्त, होण्यासाठी ॥४॥