कुठेतरी....

कुठेतरी मन झाले जागे...
कुठेतरी मज फुटली ओल
कुठेतरी उघडला शिंपला...
मी हळूच म्हटले, " आता बोल! "
कुठेतरी सल रुतूनच होती...
पुन्हा घेतले मिटून ओठ
चव अजूनही कळली नाही...
अमृत वा... विषाचा घोट !