मुद्रा राक्षसाच्या विनोदाचा माझा पहिला प्रयत्न काहींना आवडला होता. पुन्हा आणखी हा एक प्रयत्न -
- बातमी:"मला आयुष्यभर लोकांसाठी जागायचे आहे. -गायक म्हणाले" (गायचे)
- मनोगत वरील एक वाक्य:"मनोगतावर मजकूर कटवताना आता स्वयंसुधारक कार्यान्वित केलेला आहे". (चिकटवताना)
- पुन्हा तेच: मनोगतावर मजूर चिकटवताना आता स्वयंसुधारक कार्यान्वित केलेला आहे. (मजकूर)
- बातमी:सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये खांब नव्हताच! (बॉंब)
- बातमीःमुंबईत लोकलचे दोन डबे पसरले. (घसरले)
- पूर्वीच्या काळी बांधलेले दगड आणि किल्ल्या बघितल्यावर इतिहासाची साक्ष पटते. (गड, किल्ले)
- बातमीः पुणे-मुंबई महामार्गावर दरोडे कोसळले. वाहतूक विस्कळीत (दरड)
- बातमीः एका सदनिकेत काल दरड पडली. सहा लाखांचा ऐवज लंपास. (दरोडा पडला)
- बातमीः मॉन्सूनपूर्व पावसामुळे पुणेकर दगावले.
.... (सुखावले)
- पुण्यातील प्रसिद्ध वडापाव खावून आम्ही सर्व आनंदाने गुप्त झालो. (तृप्त)
- काठी बसण्यापूर्वीच साप झाडामागे तृप्त झाला. (गुप्त)
- रामायणात रामाने रावणाचा मध केला व लंकावासियांना गुप्त केले. (वध, मुक्त)