हसरा मी

तिला चोरून पाही कधी कधी मी

मनातल्या मनात तीझशी बोलेन मी

नकळत ती समोर येता माझ्या

कंठातुनी शब्द न येता डोळेच

तीझशी बोलण्यास आर्जवती

नजर दुसरीकडे नेऊन कटाक्ष टाकेन मी

जिभेची हालचाल काही न होई

आज कोसतो मजला मी

काही न बोलता फक्त हसतो मी

ती सुखी संसार मग्न अन मी

रम्य स्वप्नात गुंग आहे मी

कडेवर मूल घेऊन फिरते ती

डोळ्यात आसवे साठवून हसतो मी

                      --अक्षय