शब्द

असतील शब्द जर ओढाळ ,अवघडलेले..

 तर  फिरत राहातील,

 ढग- पाऊस-पाणी-नदी-समुद्र-बाष्प बनून

पण असतीलच  जर शब्द

तुक्याची अवलाद

तर तरून आणतील

गाथेलाही.