...............मी अनाथ.
मी पोरका.
भांबवलेला असायचो, सगळे दया दाखवायाचे, डिवचायचे
अधिकच भांबावून जायचो.
वाटायचं......
मरून जावं...... आत्ताच!
.
.
शेताच्या पायवाटेवर नागाची वारुळं..
ते बेडुक खातात.
एक बेडूक पकडला, वळली तिकडे पावलं.
काटुक घेतलं हातात,
उभा वारुळाच्या पुढ्यात. कसलीच चाहूल नाही
खूप वाट पहिली, कंटाळलो.
जिवंत परत जाण्याच्या विचाराने मरणाचा निराश झालो.
बेडुक सोडून दिला, निघालो...
नैसर्गिक मरण नशिबात नसेल,
अपघाती म्रुत्यू आजमावून पाहू...
.
.
सळचळ ऐकली गवतात.
दिसला. ...................................
..............पाच फुट लांब, सहा इंच रुंद.
सुस्त, अस्वस्थ , मेण्चट.
"समोरून बेडुक गेला राजरोस,
तू डोके आपटतोयस? "
"कातीला आलोय.. "
"ऐकून तुला भ्यालो होतो,
मरायला आलो होतो, ... तू असा कसा? "
"कातीला आलोय.. "
.
.
झाडाच्या बुंध्याशी दगड..
चिम्टित धड्पड..
आणि क्क्काय ! नवं तेजस्वी शरीर..
पुढे-मागे-आत-बाहेर.. खवले..
चमकयला लागले..
हे तेज ही नव्हाळी..
पिंपळपानांतही.. सोनझळाळी..
दगडामागे पूर्ण आकाराचा रांगडा.
नक्षीदार पापुद्र्याचा सांगाडा.
सळ्ळ्ळ्ळ, सळ्ळ्ळ्ळ..
चापल्य.... चकाकी.. शक्ती.. भीती...
पिंपळपानं, तो, मी, कात सारंच तेजाळलय.
जे पानात, जे त्याच्यात, तेच माझ्यात?
जे पानात, जे त्याच्यात, तेच माझ्यात...
जे पानात, जे त्याच्यात, तेज माझ्यात.
"कातीला आलोय ..?."
कात घेउन आलो अलगद..
जे जागलं, ते जोपसलं, ते वाढलं..
जे पानात, जे त्याच्यात, तेच माझ्यात.
आता सहचारिणी शो केस मधली कात दाखवून सांगते,
"ह्यांनी स्वतः पाहिलंय कात टाकताना."
माझी कात अद्रुश्य..
त्याची दिसते.. दाखवता येते.