फाटलेलं आभाळ...... माझ्या फाटक्या झोळीत-
-गोळा करणं जमत नाही, म्हटलं तरी दोन ओळीत.
म्हणून फक्त बघत राहतो, 'त्या'चं येणं, भिजत भिजत,
मग एखाद्याच शब्दात येते, 'त्या'ची कृपा, आतून रुजत.
असे भिजलेले शब्द, रुजलेल्या ओळीत,
हिरव्या झाडाचं गोड फळ, येतं माझ्या झोळीत.
झोळी फाटली आहे, म्हणून तर सांडता येते त्याची कृपा
सगळंच काही सांडत नाही, म्हणून पुन्हा मांडता येते त्याची कृपा,
दोन ओळीत नाही, दोन शब्दांत तरी...