धनगरांची मेंढरे

केशव, प्रकाश, तुकाराम आणि यशवंत असे चार धनगर गप्पा मारीत बसले होते. प्रत्येकाकडे किती मेंढरे आहेत याबद्दल बोलताना त्यांच्या लक्षात खालील दोन गोष्टी आल्या.

(१) तुकारामकडे यशवंतपेक्षा दहा मेंढरे जास्त आहेत.

(२) जर केशवने प्रकाशला स्वतःच्या मेंढरांपैकी एक तृतियांश मेंढरे दिली, प्रकाशने त्यानंतर (केशवची एक तृतियांश मेंढरे मिळाल्यावर) त्याच्याकडे असलेल्या एकूण मेंढरांच्या एक चतुर्थांश मेंढरे तुकारामला दिली, तुकारामने त्यानंतर (प्रकाशची एक चतुर्थांश मेंढरे मिळाल्यावर) त्याच्याकडे असलेल्या एकूण मेंढरांच्या एक पंचमांश मेंढरे यशवंतला दिली, तर सगळ्यांकडे समान मेंढरे होतील.

प्रत्येकाकडे किती मेंढरे आहेत? (जर एकापेक्षा जास्त उत्तरे शक्य आहेत असे वाटले तर कमीत कमी संख्या नमूद करावी)