हे तिचेच काव्य सारे
ही तीचीच कविता
मांडतो मैफिलीत आठवणींच्या
मीच वक्ता मीच श्रोता
होते माझेच स्वप्न खोटे
कुणाचा राग कशास धरावा
गाळुनी असहाय आसवे चार
मैफिलीचा बेरंग कशास करावा
येणार नाही ती हे ज्ञात असुनी
वाट तिची पाहण्यास्तव जगतो
रात्री चिंब भिजलेल्या पापण्या
जगासमोर दिवसा कोरड्याच ठेवतो
ओंजळीत साठऊनी थेंब थेंब तिला
तिच्याच आठवणीत चिंब भिजतो
अर्घ्य देऊनी प्रत्येक श्वासाचे
मैफिल आयुष्याची रंगवतो