तुज पाहतो मी, पुन्हा पुन्हा
नवी भासशी तु, क्षणा क्षणा
नजर तुझ्यावर, हटे... ना ह्टे
छंद जीवाचा, फिटे... ना फिटे
कोडे गुलाबी, सुटे... ना सुटे
नशा शराबी, घटे... ना घटे
हा बंध तुझ्याशी, जुना जुना
हे सांगु कसे मी, कुणा कुणा
मोह तुझा हा, टळे... ना टळे
भाव अनोखा, कळे... ना कळे
शब्द अधरी, जुळे... ना जुळे
अर्थ तयांना, मिळे... ना मिळे
इतुकाच माझा, गुन्हा गुन्हा
कसा आवरू मी, मना मना
कमी तुझी, भरे... ना भरे
ओढ तुझी, सरे... ना सरे
धुंदी तुझी, ठरे...ना ठरे
साथ तुझी, पुरे...ना पुरे
तुझ्या सयीच्या, खुणा खुणा
तुजवीण मी, उणा उणा