टाळ म्रुदुंगाची मंदियाळी
घेइ भक्तिची टाळी
मेघमल्हाराचा अवली
त्याला रसिक देती टाळी
विनोदाची सभा भरली
गडबडा लोळणारी टाळी
लक्ष वेधण्या मारली
सहजच हाकेची टाळी
नको भाषण रटाळ, वेळ भरली
घ्या हि कंटाळवाणी टाळी
खिरापतिवर नजर लागली
सुखकर्ता दुखहर्ता चि टाळी
नवरात्र कि हो आली
आता दांडियाची टाळी
माकडवाल्याची भागाबायी
तिला रस्त्याची टाळी
ज्ञानोबांची पालखी
लागली ब्रम्हानंदी टाळी
नको तेथे कावळा बसला
हाकला त्याला मारा टाळी
ऱीमिक्स भन्नाट थिरकली
मात्र वाजवत बेसुरी टाळी
सागरगोटे, चिंचोक्यांची खेळी
उड्वा हवेत वाजवा टाळी
विकेट मागे मोंगिया सारखी
शाबाश शाबश चि टाळी
सहा षटकार देउन गेली
युवराजला टाळी वर टाळी
शेकडोमध्ये एखाद्याचीच
डाव्या हाताने टाळी
ब्रिजमध्ये डाव हेरून
घ्या पार्टनर चि टाळी
तंबाखुवर मळली चुन्याची कळी
हलकेच मारा टाळी
हात झटकण्या मारलेली असे
एक फटकळ टाळी
बार मधिल चुकलेली
होती झिंगलेली टाळी
हसरी टाळी, बोलकी टाळी
आनंदी टाळी, भावुक टाळी,
दाद टाळी, साद टाळी
लोटपोट टाळी, पोलखोल टाळी
गंमत टाळी, जम्मत टाळी
सगळ्या टाळ्यांची
एक जीवन टाळी
वाजेल खरी मस्त जर
नाही मारली कधी
एका हाताने टाळी