सीन एक
सग्ळ्यांची कंटाळवाणी भाषण आटोपलियत
शहारुख खान युसुफ खानना, जीवन पुरस्कार देण्यास आतुर
दिलिपकुमार सायराच्या खांद्यावर , हात ठेउन तोल सांभाळतायत
प्रकाशझोत एकामेकास मागे सारून तळपतायत
पार्श्वसंगीत अती उच्च समेवर
तमाम प्रेक्षक डोळ्यात प्राण आणून, जिवाची मुंबै करायला उत्सुक
आणि
राज्यमंत्र्यांचा स्पिकर फोन खणखणतो
'' साहेब दोन अपक्ष टोणगे फुटले, फक्त पन्नास लाखात""
अवघ्या आसमंतात हास्य, करुणा, रुद्र, उद्व्हेग, आणी भय सुद्धा
मनात एकच
शु....... ओन सायलेंट प्लिज
----------------
सीन दोन
मध्यंतरात खच्चून गर्दी
महिला प्रसाधनात
केवळ पाच स्वछताग्रुहाबाहेर
पन्नास महिला ताटकलेल्या
आतून स्पिकर फोन खणखणतो
" अग सायरचा नेकलेस बघितलास ना, अगदी तस्साच घेतला परवा दिलिपनी माझ्यासाठी,
काय दिलिपनि?
हो , का बर ?
फारच पुड्या सोडतेस आज काल, त्या दिलिपकुमारला कय वेड लागलय?
ए बावळट, दिलिप म्हणजे , आम्चे हे , दिलिपकुमारनी देण्या इतपत कुठल आलय भाग्य माझ""
बाहेर, हशा, टाळ्या, मत्सर, आपापल्या नवरयाचा हिशेब, दिलिपकुमारच्या आरोग्यावर चरचा वगैरे
मनात मात्र एकच
शु...... ओन सायलेंट प्लिज
-----------------------
सीन तिसरा
केंडल लाइट डिनर फोर टू
पियानो कनचेर्तो इन द बक ग्राउंद्ड
शेंपेन इन टू ग्लासेस
हि हाज प्रोपोज्ड, शि इस अबोउट टु अक्सेप्ट
ही मुव्ज्स क्लोसर , वोंटस टु से स्विट नथिंग्स
आण्ड
स्पिकर फोन रिंग्स
""डार्लिंग व्हेर र यु स्विटहार्ट, आय अम वैटिंग एट द क्लब""
गेस हु सेज शु........ ओन सायलेंट प्लिज