डोंगरची मैना

उन्हाळ्याची सुट्टी

आजीचा वाडा

सारवलेली ओटी

दे धमाल आंगण

पत्र्यावरचे पापड

चुलितला कांदा

बीन अंड्याची बिस्किट

आणि गुऱ्हाळातला रस

भाड्याची सायकल तुडवत

पोहण्याचा तलाव

तालमितली माती उकरत

आस्वाद गव्हल्याचा पुलाव

कडकलक्ष्मिची फेरी आणी

वासुदेव होता मस्त

तारे मोजत झोपताना

राजा राणीची गोष्ट

काय कमी होते म्हणून

फ्लॅट बांधले त्रस्त

घेउनजा माय्क्रोवेव्ह

कोम्पुटर आणि फ्रिज

होंडाची चावी आणि

मुठेवरचा ब्रिज

बरा होता लकडिपुल

ट्रफिकची आहे दैना

आजकालच्या मुलाना

कोणी सांगा काय असते

डोंगरची मैना