असत्यमाच्या दुनीयेत

होतो जगात मी स्वच्छंद आयुष्याच्या

नेहमीच असे मी धुंदीत माझ्या मनच्या

वागणे जरी होते बेधुंद विचारांचे

काहीच नव्हते अपूर्ण दुनियेत कल्पनांच्या

बदलले हळूहळू मग जग ते स्वप्नरंजनांचे

कळले न मला कधी ते नशेत धावण्याच्या

आता नसे विसावा, चित्र हे वास्तवाचे

पळणेच आहे पुढे रे जगी या शर्यतींच्या

पापण्या ओलावतात आठवणीत गतकाळाच्या

होतो किती सुखी मी स्वच्छंद जगात  माझ्या

धावताना एकसारखे मागे मृगजळांच्या

हरवून गेलो आहे दुनीयेत असत्यमाच्या