म्यानेजर भाऊ

का सांगू राव तुम्हाले, आज कालचे पोट्टे
काम नाही काही नाही, चा पीऊन झोपते

म्या त्याले मनलं असं काऊन करतं बा?
कोडींग कोन करन, म्या का तुझा बा?

थो मने म्यानेजर भाऊ, काहून हाकते डींगा
तुमीबी ईमेल करा आन चा पीऊन झींगा

मंग मातर मायं डोकं झालं आउट
मनलं थांब लेका तुले करतो गेट आउट

कंपलेट त्याची मनलं सायबाकडं धाडू
सायब मले मने थो माया साडू

मंग तो मले मने घेन्नं, करतं का अजून बाता
मीबी पेटलो मनलं देन्नं, अपरेझल तुयं माया हाता.