टॉवर्सच्या या गुंत्यामधुनी रंगित लहरी होती सफेद
चौथा जाऊनी पहिला आला का कुणास व्हावा त्याचा खेद;
लहरींनाही का भावावे पहिले-चौथे असले भेद
विजाणूंचा चाबुक फडके नि रेड्यामुखी उमटे अर्थ वेद ||
अर्थाय स्वाहा
कामाय स्वाहा;
अर्थातून येणाऱ्या कामाय स्वाहा
कामासाठी लागणाऱ्या अर्थाय स्वाहा ||
क्षणात बदलू अवघे वेष
क्षणात भिनवू अंगी आवेश;
कमरेत वाकुनी होऊ पेश
पण पकडूच पकडू पळती रेष ||