पारिजात

पारिजात

फुलला पारिजात दारात

श्याम मुरारी हसतो गालात

शुभ्र पाकळ्यांना केशरी दांडा

समाधिस्थ जणू ऋषीचा तांडा

प्राजक्त वृक्षांचा सेतू स्वर्गाशी

भोगलेल्या क्षणाची बेरीज मनाशी

सुगंधाचा स्पर्श हृदयाशी

पावित्र्याची रांगोळी दाराशी

शुभ्र निर्मलतेचे प्रतीक बहरलेले

ध्यानस्थ ऋषीचे

दर्शन मोहरलेले

शुभ्र वसनावर केशर सांडलेले

भाग्य माझे श्याम रंगी भिजलेले

दव बिंदूंत भिजलेले स्वप्न मोहक

हसऱ्या सप्त रंगांची त्यास किनार

स्वप्न पूर्तीस्तव होण्यास समाधिस्थ

पारिजात जणू दिशा दर्शक

लेखिका : प्रतिभा देवी