क्षणाचा सोबती (२ चारोळ्या)

आपल्या दोन आयुष्यांचे

क्षण एकमेकांत मिसळून जाती

झालो मी तुझ्या आयुष्याच्या

प्रत्येक क्षणाचा सोबती

------------------

एका क्षणी तुला पाहिले

क्षण तो खास अगदी

त्या क्षणी मिळाला क्षणाला

क्षणाचा सोबती