............................
....गलबलले माझे मन!
............................
क्षितिजाच्या कोपऱ्यात
दूर दूर दूर तिथे
भरत भरत
आला घन!
आठवणींच्या समीप
जवळ जवळ खूप जवळ
गलबलले
माझे मन!!
- प्रदीप कुलकर्णी
....................................
रचनाकाल ः २७ सप्टेंबर १९९८
....................................