माणूस नाव माझे

माणूस नाव माझे माणूस जात आहे
बस माणसास जागा माझ्या घरात आहे

आहेत खास माझे,असले जरी कमी ते
माणूसकीच ज्यांच्या भिनली नसात आहे

फुटल्यात काळजाला जखमा कश्या अचानक?
आतंक पेरलेला तुमच्या मनात आहे

        -------------------स्नेहदर्शन (धुळे)