तू अलगद मिठीत घेतोस

तू जवळ असलास की
माझं मलाच कळत नाही
इतक्या मायेने, इतक्या प्रेमाने
आनंद कधीच कुरवाळत नाही
 
तू जवळ असलास की
स्वर्ग धरतीवर स्वार होतो
चांदण्यांचा एक थवा
घरटं बांधण्यासाठी तयार होतो
 
तू जवळ असलास की
स्पर्श खूप बोलका होतो
तू हात गुंतवतोस केसात नि
अतृप्त मनाचा भार हलका होतो
 
तू जवळ असलास की
तुझ्या डोळ्यातील भाव वेचत राहते
एक अनामिक ओढ नकळत
मला तुझ्यापाशी खेचत राहते
 
तू जवळ असलास की
माझा प्रत्येक क्षण मोहरतो
तू अलगद मिठीत घेतोस
माझा उभा देह शहारतो
 
तू जवळ असलास की
माझं मला काहीचं माहित नसते
रात्रभर मग गुपीत वाचते
जे साचलं मनाच्या वहीत असते
 
तू जवळ असलास की
विचार भावनांपुढे नमतं घेतात
माझं तुझ्यासवे मुक्त विहरणं
त्या गोष्टीची ग्वाही देतात
 
तू जवळ असलास की
मला वेडं लागणं निश्चीत असते
काही क्षण का होईना
माझं शहाणपण उपेक्षीत असते
 
तुझ्यामुळेच तर माझ्या गाली
एक खळी खुलली आहे
तुझ्यामुळेच तर फूल होवून
एक कळी फुलली आहे
तुझ्यामुळेच तर जिवनात
रोज दसरा नि दिवाळी आहे
पण..........
तू नाहिस तर........
भयाण एकांत, ओसाड, विराण
अभाग्य माझ्या कपाळी आहे
 
@ सनिल पांगे