मेल्यावरही ....

नशिबाला मी बोल लावला,

हरल्यावरही जिंकण्याचा अट्टहास मी केला.

सांगायला लागलो मी जेंव्हा

माझ्या त्या जपलेल्या स्मृती

गर्दी अफाट जमली

दर्दी कोणी न मिळाला.

गेले सोडून सगळे

माझे सखे सोबती

हुसकून लावल्या कितिदा

तरी आठवणी मला सोडीना.

जीव गेला तरी

अजुनही जळतो आहे

पराभवाचे शल्य

काळजात जपतो आहे

कधीतरी एकदा मी

जिंकायला हवे होते

मेल्यावर तरी

शांत वाटले असते.