लकी

"हॅलो"

"हॅलो, कशी आहेस? "

"ठीक"

"काय म्हणते तयारी? "

"कसली तयारी? "

"लग्नाची, अजून कसली तयारी विचारणार मी ? "

"लग्न मोडलं माझं... "

"का? तुला पसंत नव्हता का तो? "

"त्याला माझे मित्र पसंत नव्हते. "

"मग? "

"तो म्हणाला, लग्नानंतर अशी मैत्री मला चालणार नाही. मीही संतापले, आणि असं असेल तर लग्न मोडलं समज म्हणाले... "

"मग तो काही म्हणाला ? "

"नाही. त्याच्या वडिलांनी फोन करून सांगितलं, की त्यांना अशी मुलगी नकोय जिचे लग्नाआधी मित्र असतील."

"व्वा ! फारच छान ! "

"छान ? "

"हो. अभिनंदन !!! "

"अरे लग्न मोडलय म्हणाले मी, ठरलं नाही".

"कळलं मला... "

"मग तु माझं सांत्वन करायचं सोडून अभिनंदन काय करतोय? "

"मला एक सांग, हेच जर लग्नानंतर झालं असतं तर.... ? "

"....... "

"लकी आहेस तु"

"लकी? "

"हो. बऱ्याच मुलींना लग्नानंतर कळतं..... मग होते त्यांची घुसमट... तु सहन करू शकली असतीस ? "

"नाही"

"म्हणून तर म्हटलं की तु लकी आहेस.... कम ऑन यार.... चिअर अप.... हास जरा"

"खरं आहे तुझं. थँक्स यार. .... खरच तु माझा खरा मित्र आहेस...."