खेळ

खट्याळ वारा
करतो इशारा
अलगद चुंबन
नाजुक कळिचे.....

हसरी कळी
गालावर खळी
झुकली थोडी
शरमेने.....

अल्लड वारा
आणखी बेभान
गातो गान
प्रितीचे......

खेळ भुवरी
आंनद स्वर्गादी
निसर्ग आज
अनुभवी......