शब्द असतात
काही पुर्ण
काही अपुर्ण....
प्रेत्तेक क्षण घेउन येतो
अनेक शब्दांचे खेळ
काही संपतात
काही सुरु राहतात
अनेक दिवस
मात्र जिवनाला अर्थ देतात
काही पुर्ण
काही अपुर्ण....
म्हणुनच प्रेत्तेक शब्दानंतर
पुर्णवीराम नसतो
कारण प्रेत्तेक शब्द
वाट बघत असतो
त्याला अर्थ देणार्या
पुढच्या शब्दाची
तरीही शब्द जीवन जगतात
काही पुर्ण
काही अपुर्ण....
पण शब्दच जेंव्हा
नात्यांचा खेळ खेळू लागतात
तेंव्हा जीवनही बनते
काही पुर्ण
काही अपुर्ण....
पण मी वाट बघतोय
त्या पुर्ण शब्दाची
जो घेउन येईल
एक शेवटचा पुर्ण विराम.