प्रश्न

एक प्रश्‍न असा की,
बदलून जाते विश्‍व
एक प्रश्‍न असा की,
भंगते सुंदर स्वप्न

एक प्रश्‍न असा की,
उमलते नवी अपेक्षा
एक प्रश्‍न असा की,
अनंत काळची प्रतीक्षा

एक प्रश्‍न असा की,
जणू फुलावा प्राजक्त
एक प्रश्‍न असा की,
अश्रूही बनावे रक्त

एक प्रश्‍न असा की,
तो प्रश्‍नच न राहावा
एक प्रश्‍न असा की,
उत्तरच प्रश्‍न व्हावा

कवितेचा मूळ दुवा येथे पाहता येईल.