तीच्यासोबत चांदण्यात फ़िरण
हे तिच केवळ फ़िरण होत
माझ मात्र संपुर्ण आकाशाला गवसणी घालत
एका वेगळ्या जगात जगण होत.
तिच तारुण्य चांदण्यात
आज मनसोक्त न्हात होत
आणि तिचे मौन सुद्धा
खुप काही सांगत होत.
तीच्या डोळ्यातली शांतता
आणि गालावरील मंद स्मित
रात्रीच्या शांततेत मिसळत होत
मी आणि माझे मन मत्र
उसळनार्या सागराप्रमाणे
सतत अस्वस्थ होत.
तीच्याशी काही बोलुन
मौन तिच तोडाव
अस सतत मला वाटत होत
पण तिच्या मौनातिल सौंदर्यय तुटाव
हे मन मात्र मानत नव्हत
मग हळुच
तिच्या नजरेनेच मला साथ दिली
आणि शब्दांचे बंधन तोडुन
नजरेनेच आमची भेट झाली
आज मला कळले
शब्द आणि स्पर्शावाचून
प्रितीस एक जग आहे
आणि म्हणुनच एवढ्या लांबुन
चातक चंद्रासाठी वेडा आहे