धुंद रात्र
मंद गारवा
ओठ अधिर, तिला चुंबण्यास
पण, ति सुद्धा
तेव्हढिच लाजरी,यौवानाने नट्लेली
शशिकीरणांत न्हालेले तीचे केस
नकळत काही सांगतात
आणि मग
मनही त्यात
तसेच बेभान होते
मग तिचा तो
लाजरा नाकार,लटका राग
मला आणखीच भुरळ पाडतो
यौवनाच्या रागदरबारी
कुणी मारावा गावा
तशी दोघा मनांची
एक तार छेडली जाते
आणि ती रात्र सुद्धा
तेव्हा सरगम गाते