पालवी

गाठ पडावी तुझी काही ध्यानी मनी नसताना

डोळ्यात पाणी दाटून यावं नजरेने हसताना

खूप बोलायचं असूनही शब्द शब्द विरून जावा

तुझ्याही मौनाला मग अबोलीचा गंध यावा

गच्च दाटल्या आभाळागत तुझी माझी गत व्हावी

पाऊस न पडताच मनाला पुन्हा पालवी फुटावी