हसरे डोळे
बोलके डोळे
मनातल गुपित
जाणनारे डोळे
मनातला भाव
सांगणारे डोळे
स्वप्नांच गाव
दाखवणारे डोळे
कुणाची वाट
पाहणारे डोळे
स्वागताला तयार
आतुरलेले डोळे
कुणाच्या डोळ्यात
हरवणारे डोळे
नजरेच्या पाशात
बांधणारेही डोळे
मनात ममता
साठवणारे डोळे
काळजी अन दु:खात
वाहणारे डोळे
तुझ्यात अन माझ्यात
अंतर दखवणारे डोळे
मनामधिल अंतर
मिटवणारेही डोळेच