बेफिकीर व्हायच्या अफाट किंमती इथे

या जगात बोंबलून मी महान जाहलो
आग लावण्यास पण मला कुणी असेल का?

वक्रता, दुराभिमान, राग, द्वेष, नीचता
रक्त, मांस, हाडकांतुनी कधी निघेल का?

खाउनी पिऊन मस्त, वेळही किती मला
आज भादरायला कवी कुणी मिळेल का?

हा टुकार, तो सपाट, मी हुषार एकटा
सोड या जगास, हे मला तरी पटेल का?

'बेफिकीर' व्हायच्या अफाट किंमती इथे
पण फिकीर वाटणे मला कधी जमेल का?