तुझ्याबरोबर राहण्यापेक्षा

वाळवंटात स्वेटर विकणे सोपे आहे
तुझ्याबरोबर राहण्यापेक्षा

तिथे रात्री थंडी पडते हे सांडणीस्वाराला पटवता येते

तुझा साचा बहुधा मंथनातून निर्माण झाला असावा
आणि शंकरालाही गिळता आला नसावा
ते काय साधे हलाहल थोडेच आहे?

जाउदे

स्वतःशी बडबडण्यापेक्षा सुधारता येतंय का बघू...