स्पर्श ओझरता पुन्हा रोमांचित करून गेला
वाटले होते ऋतू फुलण्याचा टळून गेला
मस्तकाला एकदा स्वप्नी चुंबिले सख्याने
सप्तरंगी भाकिते भाळी उमटवून गेला
दरवळाया लागल्या श्वासांच्या लडी असाव्या
माळलेला मोगरा केव्हाचा सुकून गेला
पालवी फुटली अचानक वठल्या तनामनाला
अंतरी कोणीतरी अमृत शिंपडून गेला
थेंब रुजला स्वातिचा, घडला शिंपल्यात मोती
चंद्र जेव्हा अंतरी अलगद विरघळून गेला