नशीब

का कोणाला कळत नाही
'नशीब' एक पळवाट असते
निश्चयाला श्रमाची जोड़ असल्यावर
'नशीब' ही  बदलता येत असते...

आयुष्यात जिंकत असताना नेहमीच
कर्तुत्वाचा मोठेपणा मिरवला जातो
तोच डाव पलटल्यावर  मग
नशिबालाच  दोष दिला जातो

सुखानंतर दुःख, दू:खा पाठी सुख
अशीच आयुष्याची गत आहे
पण माझच नशीब ख़राब
अस इथे प्रत्येकाच मत आहे...

                                                  - देवेंद्र चुरी