आठ्वण
आठवण येते सखे
किती सोसू मी ग घाव
पंख लावी मन माझे
तुझ्याकडे घेते धाव
गुलाबाचे रान तुझे
काट्याची ग येते कीव
वात तुझी पाहताना
कासावीस होतो जीव
हरवून जातो कधी
आठ्वाच्या झुंबरात
शोध तुझा घेत घेत
उतरतो अन्धारात
समजवतो मनाला
तरी वाटे हा आभास
येती ओठातून माझ्या
गोड गाणीही उदास
तुझे रूप आठवूनी
डोळियात येते पाणी
हुरहूर वाटे जीवा
सखे का ग क्शणोक्शणी
तुझी ओढ बघ सखे
कशी छळते जीवाला
मुक्यानेच रडे मन
कधी कळणार तुला
दशरथ यादव, पुणे