नमस्कार मंडळी आपणास । सांभाळून घावे पामरास ।
आपणासमोर करितो साहस । काव्य लिहिण्याचे ॥ १॥
कवी नाही मी खचित । परी वाटती जे उचित ।
ऐसे विचार निश्चित । मांडणे आहे ॥२॥
राम बुद्धी देइल । तैसेची लेखन होइल ।
विषय तोच निवडील । प्रसंगोपात ॥३॥
आज केवळ दर्शन । रसिकजनांचे पुजन ।
आणिक रामस्मरण । घडणे होते ॥४॥
आता द्यावी आज्ञा । क्षमा करावी अज्ञा ।
अपूर्ण आमुची प्रज्ञा । प्रमाद जाहल्यासी ॥५॥
अपूर्णता पूर्ण करितो । त्राता रामची तो ।
सज्जनहो निरोप घेतो । घ्यावा राम राम ॥६॥
-लेखनसीमा ।