मी अंधारात
मी अंधारात तू बोलतेस
उजेडाची गाणी
मी नाही राजा तरी तू
झालिया ग राणी
शपथा वचने गेली कुठे ग फिराया
जीव लागलाया नुसता जुराया
पापणीच्या वळचणीला आठ्वाच पाणी
गुलाब बागेतला बघ गेलाया सुकून
काटा टोचला काळजा गेला आग ओकून
गेली करपून कशी माझी जिंदगानी
स्वप्नाचा झुला आता कसा ग झुलेल
प्रीतीच फुल आता कस ग फुलेल
मी पाळला शब्द तु केली बेइमानी
कवी शरद गोरे पुणे भ्र- ९९२२९८६३८६