एकाने मला भेट दिलेली कविता ...

संध्याकाळ कलन्डते तेव्हा माझ मन काहूरत
अता सावलीही जाणार म्हणून जरास हुरहुरत ..

खुपदा माझा एकटेपणाच माझ्याशी बोलका होतो
मग कोणी एक शब्द जरी बोलल तरी त्याचा गलका होतो

लोकांच्यात वावरताना मी तोतया म्हणून वावरतो
कोणी माझ खरा रूप ओळखल की माझ्यातला मी बावरतो

मी आहेच जरा असा एकटा एकटा रमणारा
वाळक पान सुधा गळताना , तन्मयतेने पहाणारा..