पाऊस आठवण

आला पाऊस पाऊस

माझ्या मनात भरला

जसा तुझा सहवास

फक्त स्वप्नात उरला

आठवणी तुझ्या सख्या

थेंब पावसाचे जसे

चिंब नहाताना त्यात

होते लोकांमध्ये हसे

निमित्त फक्त पावसाचे

सारा मनाचाच खेळ

आता फिरून नाही रे

कधी तुझा माझा मेळ