अशीच बोल तू सखे, जराच थांब ना
तशीच जाऊ तू नको, जराच थांब ना
मनातलेच स्पष्ट तू मला ग सांग ना
निघेल मार्ग आज तू जराच थांब ना
कशास तेच तेच स्वप्न तूच सांग ना
घडेल चांगलेच तू जराच थांब ना
खरे तुला कळूनही अजून राग का?
नकोच तू हसू तरी जराच थांब ना
न लागतो कुणासही कसाच ठाव हा
अथांग सागरातटी जराच थांब ना
सुरेल वेळ संपली जराच थांब ना
न श्वास राहिला जरी जराच थांब ना