रे मना

माझं मन सध्या थाऱ्यावर नाही
सतत तारेवर कसरत करू पाही
वसंताच्या बहराने नसेल ना हा बदल
का रे असा विक्षिप्त, चलबिचल?

विचारता तुला तू शब्दात गुंतवतोस
नवीन नवीन स्वप्ने एकटाच तू रंगावतोस
गाण्यात शोधतोस अर्थ नवे नवल
कधी विखुरलेले कधी ते चपखल॰

कधी हसतोस खलखळून, खुलून तू
कधी बसतोस एकाकीच हिरमुसून तू
कोडे हे पेचाचेच, कठीणच, ना सरल
का ही विवंचना, कसली ही हलचल?

मला झालास का रे असा अभेद्य
बोल ना सहज, उकल ते रहस्य
जाणवते अंतरीची ती हुरहूर, ती खलल
भावना ह्या क्षणभंगुर, वेदना ह्या तरल

माझं मन सध्या थाऱ्यावर नाही
सतत तारेवर कसरत करू पाही..