राहील्या हृदयात माझ्या भावना, साऱ्या कळा,
काय लिहावे! न आता, मोकळा माझा फळा.
एकदा चोरून सांगा चोर पकडावे कसे?
लुटायाचा लावला हा मीच चोरांना लळा.
काय तू बोलावले होतेस केव्हाही मला,
पण दिला नाहीस ना प्रतिसाद मनमोकळा.
विरहताना वाहती माझ्या डोळ्यांची आसवे,
भावनांनो वायदे राखून थोडे कोसळा.
जीवनी उरतोस तू, मजला सुखी करतोस तू,
समजले नव्हते कसा असतो मनाचा सापळा.