मनं वेडंपिसं होई ...

मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    साऊरीची उशी माझी ... झोप लागतचं नाही ॥
मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    निशा दाटली गडंद ... उशा उगवतं नाही ॥ १ ॥

मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    कीती खोल हीर खणु ... पाणी लागतचं नाही ॥
मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    नांगारली माय काळी ... ढगं बरसतं नाही ॥ २ ॥

मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    वाट पाहती उपाशी ... पिलं माझी घरट्यातं ॥
मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    कीती सांज ही दाटली ... खोपं सापडत नाही ॥ ३ ॥

मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    दर्या सैरभैर झाला ... शिड माझं होलपटी ॥
मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    चहुकडे जळ खोलं ... तीर दिसतचं नाही ॥ ४ ॥

मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    कीती अरि हे कापले .. रण संपतचं नाही ॥
मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    जीवं कानांमध्ये आला ... तोफ झडतचं नाही ॥ ५ ॥

मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    सखा सोडुनिया गेला ... अर्ध्यावाटी हा संसार ॥
मनं वेडंपिसं होई ... मनं वेडंपिसं होई ।
    कीती खाऊ मांडियला ... काऊ शिवतचं नाही ॥ ६ ॥

                                                        ... निलेश