हझलः
म्हणाली बाटली, "तोंडास त्याच्या वास का येतो"?
सकाळी शेण खातो, दोष मग सूर्यास का देतो?
जरा पोटात ती गेल्यावरी लाडात का येतो?
चणे, दाणे, मसाले खाउनी तो त्रास का देतो?
गुलाबी, देखण्या, भरल्या रुपावर तो फिदा होतो
जराशी याद तीची खास येता, श्वास का घेतो?
गटाटा ढोसतो वर पेटते का तीनदा बघतो
कळा त्या सोसते ती बाटली, पाडास हा येतो !
रिकामी बाटली, कचर्यात, भंगारात विकतो तो
उद्याची सोय पैशाची जरा लाडास हा येतो?
कधी मज ना कळे, बाई मला ती, सवत का म्हणते?
अगो ! आयुष्य माझे नासके, प्यायास हा येतो?