चकवा

विशाल अवकाशात एकदा
'आत्मा '
रस्ता चूकला

चकवा लागल्याप्रमाणे
गरागरा तेथेच घुसमटला

दिसली सारी वस्ती
उरफाटी पळताना
पृथ्वी तर नाही ना..

पुतळा दिसला स्वतःचाच
डोक्यावर हितचिंतक कबुतरे

भलतीकडे पाहणारे ऊच्चभ्रू
मला ऊलट्या डोक्याचा म्हणणारे
 
थबकला एका जागी
कविचाच आत्मा तो
रडत होती जनता
 
काही निर्विकार लोक
त्याच्या कवितेला चाल लावत होते

दसऱ्याचा जन्म आत्म्याचा
निघाला सीमोल्लंघनाला