तेंडल्यावर मागे एक कविता लिहिली होती, ती मनोगतावर दिसली नाही, म्हणून पुन्हा पोस्ट करतोय
---------------------
तेंडल्या, हाण पुन्हा षटकार!
हवा अम्हाला धावांचा रे, पाऊस मुस्सळधार,
तेंडल्या, हाण पुन्हा षटकार!
शेन वार्नला, ’संताजी’ तू,
शोएब म्हणतो ’धनाजीच’ तू,
भल्या-भल्यांची झोप उडविशी, असा भीम-संचार,
तेंडल्या, हाण पुन्हा षटकार!- १
कितीक विक्रम तुवा मोडिले,
खिजगणतीत ना तुझ्या राहिले,
दुमदुमतो बघ क्रिकेट-जगती, तुझाच जयजयकार,
तेंडल्या, हाण पुन्हा षटकार!-२
कोटी दिलांची असशी धडकन,
क्रिकेटचा तु खराच ’अर्जुन’,
म्हणुनी सारे म्हणती तुज- संघाचा तारणहार,
तेंडल्या, हाण पुन्हा षटकार!-३
अनंत गौरव तुला लाभती,
गर्व ना परी तुझिया चित्ती,
गौरवासही वाटे हेवा, असा तु पुरस्कार,
तेंडल्या, हाण पुन्हा षटकार!-४
-मानस६